• मुख्य मजकुराकडे
  • Language Selection Icon
  • प्रवेशयोग्यता दुवे प्रवेशयोग्यता चिन्ह
    बंद

    बांधकाम विभाग – उत्तर

    कार्यकारी अभियता, बांधकाम विभाग (उत्तर) मध्ये डोंगराळ, अतिदुर्गम व अतिवृष्टीचा भाग येतो. बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात जुन्नर, आंबेगाव , खेड, मावळ, मुळशी व भोर व वेल्हा या तालुक्यांचा समावेश होतोत. त्यापैकी जुन्नर,आंबेगाव संपुर्ण व खेड मावळ तालुक्याचा काही भाग आदिवासी क्षेत्रात मोडतो. बांधकाम विभाग (उत्तर) अंतर्गत खालील 5 उपविभाग कार्यकरत आहेत.

    • जुन्नर व आंबेगाव
    • खेड
    • मावळ
    • मुळशी
    • भोर व वेल्हा

    बांधकाम विभाग उत्तर अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला दळण वळण वळणासाठी आवश्यक असणारे ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची बांधणी  देखभाल व दुरुस्ती करणेत येते. तसेच ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक असणाऱ्या मुलभुत सुविधा उदा. गावा अंतर्गत रस्ते, गटर, प्राथमि शाळा इमारती, अंगणवाडी इमारती शौचालय, प्राथमिक आरोगय केंद्र, उपकेंद्र इमारती पशुवैदयकिय दवाखाने इ. कामे बांधकाम विभाग उत्तर मार्फत केली जातात.

    विभागाची रचना

    बांधकाम विभाग (उत्त़र) पुणे जिल्हा परिषद,पुणे

    बांधकाम विभाग उत्त़र विभागामार्फत राबविण्यात येणा-या जिल्हा परिषदेकडील जिल्हा वार्षिक योजनेमधील , तसेच राज्य शासनाकडील विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, दर्जेदार रस्ते (खडीकरण, मुरमीकरण,डांबरीकरण, काँक्रीटीकरण इ.) तयार करणे, दुरुस्ती करणे, इमारत नवीन बांधकाम , दुरुस्ती, विस्तारीकरण करणे. तसेच साकव बांधणे, छोटे पुल बांधणे इ. कामांच्या ई-निविदा प्रसिध्द़, कामांचे कार्यारंभ आदेश देणे, कामांची गुणवत्ता, दर्जा तपासणे, कामे वेळेत पूर्ण करणे, तसेच शासनाकडून प्राप्त़ झालेले अनुदान जास्तीत जास्त़ विकास कामासाठी खर्च करणे. इ. सर्व कामे वेळेत पूर्ण केली जातात.

    जिल्हा परिषद अंतर्गत विभागाकडे असलेली ठळक कामे

    *सेवा :-*

    बांधकाम विभाग उत्तर अंतर्गत ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन शासन निर्णय क्र-     संकीर्ण-2016/प्र.क्र.148/यो-9 दि-2.12.2016 नुसार खालीलप्रमाणे सुविधा देणेत येतात.

    १)सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणी प्रमाणपत्र.

    २)मजुर सहकारी संस्था नोंदणी प्रमाणपत्र.

    ३)सर्वसाधारण ठेकेदार  नोंदणी प्रमाणपत्र.

     

    अर्ज:-

    १)सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणी फॉर्म.

    २)मजुर सहकारी संस्था नोंदणी फॉर्म.

    ३)सर्व साधारण ठेकेदार नोंदणी फॉर्म.

     

    प्रमुख

    विभगाचे आर्थिक स्त्रोत

    • जिल्हा वार्षिक योजना
    • शासन निधी
    • जिल्हा परिषद निधी (स्वनिधी)
    • अभिकरण

    मे 1962 रोजी बांधकाम विभाग उत्तर या विभागाची स्थापना करणेत आलेली असुन बांधकाम विभाग उत्तर अधिनस्त आंबेगाव व जुन्नर, मुळशी , मावळ ,खेड ,भोर व वेल्हा असे एकुण 5 उपविभाग आहेत.

    बांधकाम विभाग उत्तर अधिनस्त येणारे ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांबाबतची सांख्यिकी माहिती खालील प्रमाणे.

    अ.क्र. तालुक्याचे नाव ग्रामीण मार्ग रस्त्यांची संख्या ग्रामीण मार्ग एकुण लांबी (कि.मी.) इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची संख्या इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची एकुण लांबी (कि.मी.) एकुण लांबी(कि.मी.)
    1 आंबेगाव

     

    320 744.76 25 285.60 1030.36
    2 जुन्नर

     

    416 1005.35 19 157.05 1162.40
    3 मुळशी

     

    148 379.2 18 195.70 574.90
    4 भोर

     

    287 585.62 14 102.60 688.22
    5 मावळ

     

    178 431.51 11 103.60 535.11
    6 वेल्हा

     

    151 289.7 5 60.20 349.90
    7 खेड

     

    260 643.55 17 160.85 804.40
    एकुण 1760 4079.69 109 1065.60 5145.29

     

    बांधकाम विभाग उत्तर अधिनस्त येणाऱ्या पुल , साकव, मोऱ्यांची माहिती.

    अ.क्र. तालुका पुल साकव मोरी एकूण
    1 जुन्नर 33 0 0 33
    2 आंबेगाव 10 0 0 10
    3 खेड 0 0 0 0
    4 मावळ 04 07 06 17
    5 मुळशी 16 02 0 18
    6 भोर 51 0 0 51
    7 वेल्हे 13 02 0 15
    एकुण 127 11 6 144

     

    बांधकाम विभाग उत्तर, जिल्हा परिषद पुणे

    बांधकाम विभाग उत्तर, जिल्हा परिषद पुणे मार्फत सेवा हमी कायद्या अंतर्गत  नाहरकत दाखले देणे बाबत खालील प्रमाणे सेवा अधिसुचित करणेत आलेल्या आहेत.

    1. जमीन अकृषीक करणेसाठी नाहरकत दाखला देणे.
    2. जि.प. रस्त्याच्या कडेने पाण्याची जलवाहीनी टाकणेस नाहरकत दाखला देणे.
    3. पेट्रोल पंप/ गॅस पाईप लाईन टाकणे करिता नाहरकत दाखला देणे.
    4. ऑप्टीकल फायबर केबल टाकणे करिता नाहरकत दाखला देणे.

    माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4(1)(ख) नुसार 1 ते 17 बाबी ची माहिती
     

    • दूरध्वनी : 020-26133485
    • पत्ता : जिल्हास्तरीय कार्यालये