बंद

    कृषी विभाग

    प्रस्तावना

    भारत हा कृषि प्रधान देश असून कृषि हा अर्थ व्यवस्थेचा आधारस्तंभ मानला जातो. देशाच्या स्थुल राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा 13.7% आहे. भौमितिक पद्धतीने वाढणारी देशाची लोकसंख्या पाहता कृषि उत्पन्नामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खते, औजारे, पीक संरक्षण औषधे इ. बाबी शेकऱ्यांना माफक दरात योग्यवेळी उपलब्ध होणे व त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणीव-जागरुकता निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेऊन व बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे कृषि विभाग, जिल्हा परिषद पुणे कार्यरत आहे. पुणे जिल्हयात एकुण 13 तालुक्यांचा समावेश असून जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्रफळ 15,62,018 हे. असून लागवडीखालील निव्वळ क्षेत्र 9,91,787 हे. (75.9%).

    हंगामनिहाय पीकांखालील क्षेत्र – खरीप हंगाम – 3,58,800 हे. रब्बी हंगाम – 5,35,200 हे. उन्हाळी – 6,100 हे. पुणे जिल्हयाच्या हवामान वैशिष्टयांचा विचार करता जिल्हयाचे सर्वसाधारण हवामान उष्ण आहे. पश्चिमेकडील हवामान थंड तर मध्य भागातील कोरडे असून पुर्वेकडील तालुक्यांमध्ये उष्ण व कोरडे आहे. जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान 845.8 मिमि. असून जुन ते ऑक्टोंबर कालावधीमध्ये बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडते. पुर्वेकडील तालुक्यांत इशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पुर्वेकडे कमी होत जाते. महत्वाची वेबपेजेस