बंद

    सांसद आदर्श ग्राम योजना

    • तारीख : 14/02/2025 -

    उद्देश :- 1) निवडलेल्या ग्रामपंचायतीचा समग्र विकास साधणा-या प्रक्रियांचा वेग वाढविणे. 2) जनतेच्या सगळयाच वर्गांचे राहणीमान आणि जीवनमानात निम्नांकित उपायांनी, वास्तविक सुधारणा आणणे. 3) स्थानिक पातळीवरील विकासांच्या आणि परिणामकारी स्थानीय शासनाचे आदर्श निर्मित करणे ज्यामुळे आसपासच्या ग्राम पंचायतींना शिकण्याची आणि या आदर्शांना स्वीकारण्याची प्रेरणा मिळू शकेल. 4) निवडलेल्या आदर्श गावांना स्थानिक विकासाच्या विदयालयाप्रमाणे वाढवणे जेणे करुन इतर ग्रामपंचायतींना प्रशिक्षित करता यावे. दृष्टीकोन :- उद्देशांच्या पूर्तीसाठी सांसद आदर्श ग्राम योजनेचे मार्गदर्शन निम्नांकित दृष्टीकोणाने होईल. 1) खासदारांना(सांसदांना) आदर्श ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेतृत्व, क्षमता, प्रतिबध्दता आणि उर्जा यांचा उपयोग करण्यास प्रवृत्त करुन कार्यकुशलता वाढवावी. 2)स्थानिक पातळीवर भागीदारीसह विकास साधण्यासाठी सगळया समुदायांना एकजूट करुन त्याकरवी कामे करवणे. 3) जन-आकांक्षा आणि स्थानिक क्षमतेनुरुप व्यापक विकासाचे उद्दिष्ट साधण्यासाठी विभिन्न सरकारी कार्यक्रम आणि खाजगी आणि स्वैच्छिक क्षेतत्रातील पुढाकार या दोन्हीत ताळमेळ बसवावा. 4) स्वैच्छिक संगठन, सहकारी संस्था, शैक्षणिक व अनुसंधान कार्य करणा-या संस्थासोबत भागीदारी वाढवणे. 5) परिणाम आणि सातत्यावर लक्ष केंद्रित ठेवणे. कामाचे स्वरुप :- सांसद आदर्श ग्राम योजनांतर्गत निवड झालेल्या गावाने आपला विकास खासदार, ग्रामपंचायत, गावकरी आणि सरकारी तंत्राच्या यथोचित सुविधांच्या सहाय्याने लोकांच्या सहभागी विचार-विनिमयाने त्यांची कार्यक्षमता आणि उपलब्ध संसाधने इत्यादिंचा जास्तीत जास्त उपयोग साधून करावा. वैयक्तिक विकास, मानवी विकास, सामाजिक विकास,आर्थिक विकास, पर्यावरण विकास, मूलभूत सुविधा आणि सेवा, सामाजिक सुरक्षा, सुशासन आदर्श ग्राम ची निवड :- 1) ग्रामपंचायत हे मूळ एकक राहील, सपाट,मैदानी भागात एका पंचायतीची लोकसंख्या 3000 ते 5000, पर्वतीचे, जनजातीय,दुर्गम क्षेत्रात 1000 ते 3000 राहू शकेल, असे जिल्हे जिथे या एककाचा आकार निश्चित नसेल तेथे अशा ग्रामपंचायतींची निवड होऊ शकेल.2) संबंधित खासदार महोदयांस त्यांना योग्य वाटेलेली ग्रामपंचायत निवडण्याचे स्वातंत्र्य राहील. पण त्यांनी आपले स्वत:चे वा आपल्या पतीचे/पत्नीचे गांव निवडू नये. 3) सांसद एक ग्राम पंचायत तात्काळ विकासासाठी निवडतील व आणखी दोन ग्रा.पं. काही अवधीनंतर निवडून ठेवतील. 4) प्रारंभीचे लक्ष्य मार्च 2019 पर्यंत तीन आदर्श ग्राम विकसित करण्याचे आहे. त्यापैकी एक 2016 पर्यंत साधले जाईल, त्यानंतर अशा पाच आदर्श गावांची निवड करण्यात येईल. ( दरवर्षी एक याप्रमाणे) आणि 2024 पर्यंत त्यांचा विकास करण्यात येईल.

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    सम्बंधित विभागाशी संपर्क साधावा