• मुख्य मजकुराकडे
  • Language Selection Icon
  • प्रवेशयोग्यता दुवे प्रवेशयोग्यता चिन्ह
    बंद

    प्राथमिक शिक्षण

    पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात 3546 शाळा आहेत. या शाळांमध्ये 238395 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी एकूण 11228 शिक्षक मंजूर आहेत.

    जिल्हा परिषद पुणे, शिक्षण विभाग रचना

    अनु. संवर्ग मंजूर पदे
    1 शिक्षण अधिकारी
    2 उपशिक्षक्षणाधिकारी 3
    3 गट शिक्षणाधिकारी १३
    4 विस्तार अधिकारी ९७
    5 केंद्रप्रमुख 305
    6 मुख्याध्यापक ३५८

    जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक पुणे अंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या योजना

    प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनाः

    प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना अंतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पौष्टिक मध्यान्ह भोजन आहार दिला जातो. आठवड्‌यातून एकदा पूरक आहार दिला जातो.

    समावेशीत शिक्षण सहाय्य सेवा सुविधाः

    मदतनीस भता, वाचक भत्ता, प्रवासभत्ता, मदतनीस / आया। परिचर, प्रोत्साहन भत्ता.

    मोफत गणवेश वाटप योजनाः

    योजनेचा उ‌द्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेंतर्गत इयता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केला जातो.

    मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजना:

    १ ली ते ८ वी मधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली जातात, त्यामुळे शिक्षणात सातत्य राहण्यास मदत करते.

    २५% RTE शाळा प्रवेश योजनाः

    २५% RTE शाळा प्रवेश योजनेअंतर्गत, आर्थिक दुर्बल आणि वंचित गटातील वि‌द्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची संधी मिळते, वंचित गटातील विद्यार्थीः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग, दिव्यांग विद्यार्थी, अनाथ विद्यार्थी, कोविडमुळे पालकांचे निधन झालेले वि‌द्यार्थी या योजनेत पात्र ठरतात.

    माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4(1)(ख) नुसार 1 ते 17 बाबी ची माहिती

    • दूरध्वनी : 020-26137144
    • पत्ता : जिल्हास्तरीय कार्यालये