माध्यमिक शिक्षण
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद,पुणे कार्यरत आहे. सदर विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व शासन मान्य माध्यमिक शाळा चालू असून यामध्ये अनुदानित , विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं-अर्थसहाय्यित शाळा व विविध माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. यामध्ये इयत्ता 5 ते 10, इयत्ता 5 वी ते 12 वी,इयत्ता 8 वी ते 10 वी, इयत्ता 8 वी ते 12 वी अशा प्रकारच्या शाळांचे प्रशासन या विभागामार्फत चालवले जाते.
सर्व शाळांमध्ये शासनाच्या विद्यार्थिभिमुख अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. यामध्ये सोबत विविध योजनांची माहिती सविस्तर देण्यात आली आहे.प्रतिवर्षी शासन निकषानुसार पदनिश्चिती केली जाते व त्यानुसार अनुदानित शाळेतील शिक्षकांचे वेतन, वेतन पथकामार्फत अदा केले जाते. वेतन पथक व शिक्षण विभाग (माध्यमिक) या दोन्ही विभागाचे कार्यालय प्रमुख म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) काम पाहतात व त्यांचे अधिनस्त असलेले अधिकारी / कर्मचारी यांच्या सहकार्याने विविध योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवल्या जातात.
माहिती व संगणकाच्या युगात माध्यमिक शिक्षण विभागाचे काम संगणकाच्या मदतीने केले जाते. त्यानुसार माध्यमिक विभागांतर्गत असलेले विविध परिपत्रके, शासन निर्णय, विविध योजना यांची माहिती वेबसाईटच्या माध्यमातून दिली जाते. त्याचप्रमाणे सेवक संच निश्चिती,भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय देयके इत्यादी बाबींची कार्यवाही केली जाते. विद्यार्थी गुणवत्ता, शाळा तपासणी, नाविन्यपूर्ण उपक्रमांची कार्यवाही करून जिल्ह्यातील शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विभाग कार्यशील आहे.
विविध योजना
अ. क्र. | योजनेचे नाव | इयत्ता | योजनेची माहिती |
१ | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी शिष्यवृत्ती योजना (NMMSS) | इ.९वी ते
इ.१२ वी |
|
२ | राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) | इ. १० वी |
|
३ | विज्ञान प्रदर्शन | इ.६वी ते
इ.१२ वी
|
|
४ | इंस्पायर अवार्ड मानक | इ.६वी ते
इ.१० वी |
|
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
अ. क्र. | विभाग | प्रश्न | उत्तर |
१ | माध्यमिक शिक्षण विभाग | पवित्र पोर्टल ऐवजी संस्थेला स्वत शिक्षक पदभरती करता येते का ? | अल्पसंख्यांक संस्था वगळून इतर संस्थांना पवित्र पोर्टल व्यतिरीक्त स्वत पदभरती करता येणार नाही. |
२ | माध्यमिक शिक्षण विभाग | लिपिकांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही कशी करावी ? | संचमान्यतेनुसार जादाकडून कमीकडे समायोजन झाल्यानंतर शासनाचे आदेश येतील त्याप्रमाणे रिक्त पदे भरण्याची कार्यवाही होईल. |
३ | माध्यमिक शिक्षण विभाग | स्वयंअर्थसहाय्यित नवीन शाळा सुरू करताना संस्थेच्या नालकीची अथवा भाडेकराराची किती जमीन असणे आवश्यक आहे ? | १ एकर जागा असणे आवश्यक आहे |
४ | माध्यमिक शिक्षण विभाग | कनिष्ठ महाविदयालयीन कर्मचा-यांची वैयक्तीक मान्यता कोणत्या कार्यालयामार्फत होते ? | शिक्षण उपसंचालक कार्यालव पुणे विभाग पुणे |
५ | माध्यमिक शिक्षण विभाग | वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण नाही. आवश्यक आहे का ? | नाही. |
६ | माध्यमिक शिक्षण विभाग | निवडश्रेणीसाठी पात्र शिक्षक बरिष्ठश्रेणी प्राप्त असणे आवश्यक आहे का ? | होय. |
७ | माध्यमिक शिक्षण विभाग | सेवाजेष्ठता यादी कशाप्रकारे तयार करावी ? | एम.इ.पी. एस. अॅक्ट १९८१ मधील निवम १२ अनुसुची फ नुसार व शासन निर्णय ३ मे २०१९ नुसार |
८ | माध्यमिक शिक्षण विभाग | विद्यार्थी जात वदल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? | विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, पालकांचे प्रतिज्ञापत्र, प्रपत्र नमुना ३ |
९ | माध्यमिक शिक्षण विभाग | विदयार्थ्यांच्या नावात बदल करण्यासाठी आवश्यक कागद पत्रे कोणती ? | विदयार्थ्यांचा जन्म दाखला, राजपत्र, पालकाचे प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, पपत्र नमुना १ व २ |
१० | माध्यमिक शिक्षण विभाग | इंस्पायर अवार्ड योजने अंतर्गत नामांकन कसे सादर करावे ? | विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकारच्या वेव पोर्टल E-MIAS वर शाळेची नोंदणी करावी. तदनंतर विदयार्थ्यांचे नामांकन नाव नोंदणी करावी |
माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4(1)(ख) नुसार 1 ते 17 बाबी ची माहिती
- दूरध्वनी : 020-26050733
- पत्ता : जिल्हास्तरीय कार्यालये