• मुख्य मजकुराकडे
  • Language Selection Icon
  • प्रवेशयोग्यता दुवे प्रवेशयोग्यता चिन्ह
    बंद

    बांधकाम विभाग – दक्षिण

    कार्यकारी अभियता, बांधकाम विभाग (दक्षिण) बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात हवेली,पुरंदर, शिरुर, दौंड, इंदापूर व बारामती या तालुक्यांचा समावेश होतोत. बांधकाम विभाग (दक्षिण) अंतर्गत खालील 5 उपविभाग कार्यरत आहेत.

    • हवेली/पुरंदर
    • शिरुर/दौंड
    • बारामती
    • इंदापूर
    • उपविभाग इमारत

    बांधकाम विभाग दक्षिण अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला दळण वळण वळणासाठी आवश्यक असणारे ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची बांधणी करणेत येते. तसेच ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक असणाऱ्या मुलभुत सुविधा उदा. गावा अंतर्गत रस्ते, गटर, प्राथमि शाळा इमारती, अंगणवाडी इमारती शौचालय, प्राथमिक आरोगय केंद्र, उपकेंद्र इमारती पशुवैदयकिय दवाखाने इ. कामे बांधकाम विभाग उत्तर मार्फत केली जातात.

     

    जिल्हा परिषद अंतर्गत विभागाकडे असलेली ठळक कामे

    १)बांधकाम समिती कामकाज.

    २)मुख्यालय / जुनी जिल्हा परिषद इमारत  देखभाल दुरुस्ती

    ३)आस्थापना कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

     

     

    विभगाचे आर्थिक स्त्रोत

    • जिल्हा वार्षिक योजना
    • शासन निधी
    • जिल्हा परिषद निधी (स्वनिधी)
    • अभिकरण

    बांधकाम विभाग दक्षिण

    मे 1962 रोजी बांधकाम विभाग दक्षिण या विभागाची स्थापना करणेत आलेली असुन बांधकाम विभाग दक्षिण अधिनस्त हवेली,पुरंदर,बारामती ,इंदापुर, दौंड व शिरूर असे एकुण 6 उपविभाग आहेत.

    बांधकाम विभाग दक्षिण अधिनस्त येणारे ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांबाबतची सांख्यिकी माहिती खालील प्रमाणे.

    अ.क्र. तालुक्याचे नाव ग्रामीण मार्ग रस्त्यांची संख्या ग्रामीण मार्ग एकुण लांबी (कि.मी.) इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची संख्या इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची एकुण लांबी (कि.मी.) एकुण लांबी(कि.मी.)
    1 हवेली 497 1000.40 12 118.57 1118.97
    2 पुरंदर 351 830.26 15 167.45 997.71
    3 बारामती 423 1221.83 15 161.00 1382.83
    4 इंदापुर 306 828.80 9 55.97 884.77
    5 दौंड 284 788.49 5 38.72 827.21
    6 शिरूर 306 896.30 18 251.55 1147.85
    एकुण 2167 5566.08 74 793.26 6359.34

     

    बाधकाम विभाग दक्षिण अधिनस्त येणाऱ्या पुल , साकव, मोऱ्यांची माहिती.

    अ.क्र. तालुका पुल साकव मोरी एकूण
    1 2 3 4 5 6
    1 हवेली 11 0 0 11
    2 पुरंदर 110 0 0 110
    3 बारामती 80 2 0 82
    4 इंदापुर 199 0 0 199
    5 दौंड 107 0 0 107
    6 शिरूर 130 0 0 130
    एकुण 637 2 0 639

     

    बांधकाम विभाग दक्षिण, जिल्हा परिषद पुणे मार्फत सेवा हमी कायद्या अंतर्गत  नाहरकत दाखले देणे बाबत खालील प्रमाणे सेवा अधिसुचित करणेत आलेल्या आहेत.

    1. जमीन अकृषीक करणेसाठी नाहरकत दाखला देणे.
    2. जि.प. रस्त्याच्या कडेने पाण्याची जलवाहीनी टाकणेस नाहरकत दाखला देणे.
    3. पेट्रोल पंप/ गॅस पाईप लाईन टाकणे करिता नाहरकत दाखला देणे.
    4. ऑप्टीकल फायबर केबल टाकणे करिता नाहरकत दाखला देणे.

    बांधकाम विभाग(दक्षिण) विभागाचे माहिती अधिकार 1-17 बाबी वर्ष 2025

     

    • दूरध्वनी : 020-26133425
    • पत्ता : जिल्हास्तरीय कार्यालये