जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)
पुणे जिल्हा परिषदेमधील पाणी व स्वच्छता विभाग हा एक विभाग आहे. पाणी व स्वच्छता विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम, व योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पाणी व स्वच्छता समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. मा मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे प्रमुख नियंत्रणाखाली जिल्ह्यातील पाणी व स्वच्छता विषयक विविध योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.
ग्रामीण भागातील जनतेस दर दिवसी दर व्यक्तीला 55 ली शुद्ध पाणी पुरवणे व वैयक्तीक शौचालये देणे बरोबरच स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण गाव स्तरावर निर्माण करून देणे.
स्वच्छ भारत मिशन योजना उद्देश :
• पुणे जिल्हयातील सर्व तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना आरोग्यदायी जीवनाचा लाभ करुन देणे महिला, अबाल-वृध्द, यांचेसाठी सुलभरित्या शौचालयाची उपलब्धता होवून स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगणे तसेच माती, हवा, पाणी पर्यायाने संपूर्ण पर्यावरण प्रदूषण मुक्त करुन समाज रोगराईमुक्त करणे, प्रतिष्ठित, आरोग्यदायी, कुचंबनारहित जीवनशैलीचा अंगीकार करणे, सांडपाणी, घनकचरा, मैला आदी बाबींचे सुयोग्य तथा पर्यावरणानुकुल व्यवस्थापन करणे हा योजनेचा उद्देश आहे.
• जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन या केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजना गावपातळीवर राबविल्या जातात.
• स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र पुरस्कृत योजनेतून पात्र लाभार्थ्यांना रुपये 12,000/-वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन अनुदान या विभागामार्फत देण्यात येते. अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा ऑनलाइन सिटिझन अप्लिकेशन वर अर्ज करा लिंक:
अर्ज करा तसेच, सार्वजनिक शौचालय बांधकाम व घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गावपातळीवर राबविले जातात.
• जल जीवन मिशन या केंद्र पुरस्कृत योजनेतून वैयक्तिक नळजोडणी नसलेल्या कुटूंबाला वैयक्तिक नळजोडणी देण्यात येते.
• जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छतेविषयक विविध विषयांची प्रशिक्षणे व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात.
माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4(1)(ख) नुसार 1 ते 17 बाबी ची माहिती
- दूरध्वनी : 020-26052938
- पत्ता : जिल्हास्तरीय कार्यालये