• मुख्य मजकुराकडे
  • Language Selection Icon
  • प्रवेशयोग्यता दुवे प्रवेशयोग्यता चिन्ह
    बंद

    जिल्हा परिषद ( ल ‌.पा ) विभाग

    पुणे जिल्हयांचे भौगोलिक क्षेत्र १५,६२,०५८ हेक्टर. एवढे असुन यापैकी लागवडी लायक क्षेत्र ११,५६,२०० हेक्टर (७४%) एवढे आहे. जिल्हयांचे हवामानाच्या दृष्टिने दोन भाग पडतात. पश्चिम भाग हा डोंगराळ असून तो अतिपावसाचा आहे. या भागात पावसाळयांत अतिप्रमाणांत पाऊस पडतो पण जानेवारी ते जून या काळांत या भागांत पाण्याची टंचाई जाणवेत. पूर्व भाग प्रामुख्याने पठारी प्रदेश आहे. या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने तो प्रामुख्याने अवर्षण प्रवण आहे. या भागात लागवडीलायक क्षेत्र मोठया प्रमाणांत असल्याने शेतीसाठी पाण्याची मागणी मोठया प्रमाणांत आहे. सिंचनाचे माध्यमातून शेतीचे उत्पादन वाढविणेसाठी शासनामार्फत अनेक सिंचन योजनांची कामे हाती घेण्यांत येतात. सिंचन योजनांचे व्याप्तीनुसार शासनाने तीन विभाग सिंचन क्षेत्रात कामे करतात.

    त्याचा तपशिल पुढील प्रमाणे:
    1) 0 ते 100 हेक्टर मधील प्रकल्प जिल्हा परिषद ल.पा.विभाग
    2) 101 ते 600 हेक्टर मधील प्रकल्प मृद व जलसंधारण विभाग (राज्यस्तर)
    3) 601 हेक्टर वरील प्रकल्प जलसंपदा विभाग मार्फत राबवली जातात.

    जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागा मार्फत १०० हे पर्यन्त सिंचन क्षमतेच्या योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने खालील योजनांचा समावेश होता:
    1. पाझर तलाव व गाव तलाव (० ते १०० हेक्टर सिंचन क्षमता)
    2. साठवण बंधारे (० ते १०० हेक्टर सिंचन क्षमता)
    3. वळण बंधारे (० ते १०० हेक्टर सिंचन क्षमता)
    4. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (० ते १०० हेक्टर सिंचन क्षमता)
    5. पाझर तलावासाठी खाजगी मालकीच्या जमिनीचे भूसंपादन
    6. ० ते १०० हेक्टर पर्यंतच्या नादुरुस्त लपा योजनेची दुरुस्ती करणे

    वरील पैकी 1 ते 4 योजना सामुहिक लाभाच्या आहेत तर 5 ची योजना वैयक्तिक लाभाची आहे.

    जिल्हा परिषद स्थापनेपासून ल.पा विभागामार्फत 2631 लपा योजना निर्माण करून 141487 (सघमी) सहस्र घनमीटर पाणीसाठा निर्माण होऊन 58136 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे‌.
    अधिक माहितीसाठी
    ल.पा.विभाग माहिती अधिकार 2005 4(1)(ख) ची माहीती

    जिल्हा परिषद ल.पा विभाग तलावातील मुरूम उचलण्यास ना हरकत दाखला प्रणाली.

     

    • दूरध्वनी : 020-26131605
    • पत्ता : जिल्हास्तरीय कार्यालये