• मुख्य मजकुराकडे
  • Language Selection Icon
  • प्रवेशयोग्यता दुवे प्रवेशयोग्यता चिन्ह
    बंद

    पशुसंवर्धन विभाग

    पशुसंवर्धन विभाग हा पशुधनाच्या विकासासाठी आणि पशुपालकांच्या हितासाठी कार्यरत असतो.पशुसंवर्धन हा शेतकरी व पशुपालकांचा बारमाही व्यवसाय आहे. पशुसंवर्धन हा व्यवसाय शेतीस पूरक तर आहेच, परंतु आजच्या गतीमान युगात या व्यवसायास उद्योगाचे स्वरूप आले आहे. पशुसंवर्धनामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध झाला आहे. पशुपालन क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीची जास्तीत जास्त क्षमता आहे. पशुसंवर्धनाच्या विविधांगी प्रकारांनी पशुपालक व पशुसंवर्धनाशी निगडीत असलेल्या सर्व व्यवसायांची भरभराट झाल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील जनसामान्यांचा आर्थिक विकास होऊन त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मोठा हातभार लागत आहे. पशुसंवर्धनामुळे व्यक्ती व समाजाच्या उन्नतीबरोबरच हा व्यवसाय राष्ट्रीय उत्पन्नात भर घालण्यास निश्चितच मदत करतो. कारण या व्यवसायातून निर्मित उत्पादने उदा. दूध,मांस, अंडी व इतर पदार्थ व उपपदार्थ यांच्या निर्यातीमुळे देशास परकीय चलन प्राप्त होते. ही महत्त्वाची पार्श्वभूमी लक्षात घेवून पशुधनाचा विकास व वाढीसाठी सातत्याने आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे उदा. कृत्रिम रेतनाच्या सुविधा आणि पशुआरोग्यासाठीच्या सोयी सुविधा या दोन महत्त्वाच्या सेवा पशुसंवर्धन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत हा विभाग ग्रामीण भागात पशुधन आरोग्य संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी विविध सेवा ,उपक्रम व  योजना राबवितो.

    जिल्ह्यात एकूण 228 पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत पशुवैद्यकीय सेवा पुरविल्या जातात. जिल्ह्यात 20 व्या पशुगणनेनुसार 11,44,893 एवढे पशुधन असून 8,66,538 शेळ्या व मेंढयाची संख्या आहे.

    पशुसंवर्धन विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या तांत्रिक सेवा: 

    शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांद्वारे पशुधनासाठी आरोग्य तपासणी आणि उपचार करण्यात येतात . गायी व  म्हशी यांना कृत्रिम रेतन करणे , गर्भ तपासणी करणे, वंधत्व तपासणी करणे अशा सेवा पुरवून पशुधना मध्ये गुणात्मक वाढ करणे जेणेकरून पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ होइल. तसेच  मेंढ्या, शेळ्या आणि कुक्कुट पक्ष्यांसाठी उपचार सेवा पुरविल्या जातात. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाने आणि फिरत्या पशुचिकित्सा केंद्रांद्वारे  या सेवा पुरविल्या जातात.

    जनावरांमधील संसर्गजन्य  लाळ खुरकुत  (FMD), फऱ्या (BLACK QUARTER) , घटसर्प (H.S.), पी पी आर  (PPR) व लम्पी स्कीन डिसीज (LSD) या  आजारांवर प्रतिबंध करण्यासाठी  नियमित लसीकरण मोहीम राबविली जाते.

    पशुसंवर्धन विभागाचे  विस्तार कार्य :  

    पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालन तंत्र, चारा व्यवस्थापन, दुग्धव्यवसाय आणि मेंढीपालनावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येतात . शास्त्रीय दृष्ट्या पशुपालन करण्यासाठी पशुपालकांना  आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान, दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी सल्ला व मार्गदर्शन केले जाते. पशुपालन व्यवसाय आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी  पशुधनास  पुरेसा आणि पौष्टिक चारा लागवड करणेसाठी मार्गदर्शन करण्यात येते व  100% अनुदानावर सुधारित वाणाचे वैरण बियाणे वाटप करण्यात येवून चारा  व मुरघास निर्मितीस प्रोत्साहन दिले जाते.

    पशुसंवर्धन विभागाच्या योजना  :

    अ.क्र. योजनेचे नाव उद्देशव स्वरुप            लाभार्थी निवड अटी खर्च अनुदान निवड प्रक्रिया
    1 दुधाळ जनावरांचा गट वाटप ( २ गाय / म्हैस) अनु.जाती/ जमातीच्या लाभार्थींना ७५ % 2 दुधाळ जनावरांचा गट वाटप 1.     लाभार्थीअनु.जाती/जमातीचा असावा

    2.     30%  महिला व 3% विकलांग यांना प्राधान्य

    3.       ०१.०५.२००१ नंतर ३ रे अपत्य नसल्याचा दाखला

    4.     अत्यल्प / अल्प भूधारक तसेच सुशिक्षित बेरोजगार यांना  प्राधान्य

    १. गाय गट – १,५२,६३८/- (विमा सह)

    अनुदान ७५%  १,१७,६३८/-

     

    २. म्हैस गट – १,७४,४४३ /- (विमा सह)

    अनुदान ७५%  १,३४,४४३/-

    ऑनलाइन पध्दतीने
    2 शेळी गट वाटप ( १० शेळ्या व १ बोकड) अनु.जाती/ जमातीच्या लाभार्थींना ७५% संगमनेरी /उस्मानाबादी शेळीगट १0+१
    1. लाभार्थीअनु.जाती/जमातीचा असावा
    2. ३०%  महिला व 3% विकलांग यांना प्राधान्य
    3. ०१.०५.२००१ नंतर ३ रे अपत्य नसल्याचा दाखला
    4. अत्यल्प / अल्प भूधारक तसेच सुशिक्षित बेरोजगार यांना  प्राधान्य
    एकुण किंमत ९०,०००/- + विमा- १३,५४५/-

    एकुण १०३५४५/-

    ७५ %  अनुदान ७७६५९/-

    ऑनलाइन पध्दतीने

    माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4(1)(ख) नुसार 1 ते 17 बाबी ची माहिती

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-2005 अंतर्गत लोकसेवा

    संपर्क माहिती:

    पुणे जिल्ह्यातील पशुसंवर्धन सेवा आणि योजनांबाबत अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

    मुख्य कार्यालय:

    जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

    दूरध्वनी क्रमांक: (०२०) २६१३१७९९