आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना
राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार विविध योजनेच्या अंमलबजावणी करुन स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा आणि पर्यावरण व पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर अशा बाबीवर गुणांकन देऊन स्मार्ट ग्रामपंचायतीची निवड करुन जिल्हास्तर व तालुकास्तर असे पुरस्कार देण्याबाबत शासनाने दि.21/11/2016 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. माजी उपमुख्यमंत्री आर.आर. (आबा) पाटील यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात बहुमुल्य योगदान दिलेले आहे. ग्रामीण विकासातील त्यांचे योगदान विचारात घेऊन राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेस आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना असे शासन निर्णय दि.20/03/2020 अन्वये मंजूरी दिली आहे. लाभार्थी : जिल्हयातील ग्रामपंचायती तालुकास्तर निवड : दि.21/11/2016 च्या शासन निर्णयातील परिशिष्ट “अ” येथील नमुद निकषानुसार जिल्हयातील ग्रामपंचायतींनी स्व-मुल्यांकन करुन गुणांकन संबंधित पंचायत समिती कार्यालयास पाठविले जातात. तालुकास्तरावर तालुका तपासणी समिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी हे गठीत करतात. सर्वाधिक गुण मिळविलेली ग्रामपंचायत तालुका स्मार्ट म्हणून घोषित करण्यात येते. तालुस्मार्ट ग्रामपंचायतीस रक्कम रु.10 लक्ष एवढे पारितोषिक देण्यात येते. जिल्हास्तर निवड : जिल्हयातील सर्व तालुका स्मार्ट ठरलेल्या ग्रामपंचायतींचे पुर्नमुल्यांकन करुन सर्वाधिक गुण असलेल्या ग्रामपंचायतीस जिल्हा स्मार्ट म्हणून जिल्हा समिती घोषित करते. जिल्हास्मार्ट ठरलेल्या ग्रामपंचायतीस रक्कम रु.40 लक्ष पारितोषिक देण्यात येते. योजनेची उद्दीष्टे : 1) पर्यावरण समतोल राखण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा विकास करणे व त्यासाठी लोकसहभाग मिळविणे 2) पर्यावरणाचे भान ठेऊन भौतिक सुविधा उपलब्ध करणे व इको व्हिलेजची संकल्पना राबवून समृध्द ग्राम निर्माण करणे 3) यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या ग्रामस्तरीय विविध योजनांची सांगड घालून योजनांचा समन्वय करणे व जेथे ही संकल्पना राबविण्यासाठी नव्या योजनांची, कार्यक्रमांची गरज आहे, ती पोकळी भरण्यासाठी तसे कार्यक्रम/योजना ग्रामविकास वि 4) भागामार्फत कार्यन्वित करणे योजनेंतर्गत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना पारितोषिक प्राप्त रकमेतून खालील कामे करण्यात येतात. 1) अपारंपारिक उर्जा संबंधित अभिनव प्रकल्प 2) स्वच्छतेबाबत अभिनव प्रकल्प 3) महिला सक्षमीकरण आणि मुलांना अनुकूल प्रकल्प 4) स्वच्छ पाणी वितरण प्रकल्प 5) भौगोलिक माहिती प्रणाली बसविणे (जीआयएस) 6) आंतरराष्ट्रीय मानदंड/ मार्गदर्शक तत्वे संकलन आणि तपासणी सूची तयार करुन दर्जा वाढविण्यासाठी प्रकल्प राबविणे. 7) ग्रामपंचायतीच्या हद्दीन सौर पथदिवे बसविणे 8) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सार्वजनिक जमिनीवरील अनिक्रमण रोखण्यासाठी कुंपण घालणे 9) स्मार्ट ग्राम योजने अंतर्गत/आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजने अंतर्गत निवड झालेल्या ग्रामपंचायतीने नागरीकांच्या सोयीसाठी इंटरनेट वायफाय सिस्टिम बसविणे. योजनेचा कालावधी : दि.1 जून ते 16 फेब्रुवारी
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
सम्बंधित विभागाशी संपर्क साधावा