बंद

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

    • तारीख : 14/02/2025 -

    योजनेची ठळक वैशिष्टये :- 1) ग्रामीण भागातील अंगमेहनतीने अकुशल काम करण्याची तयारी असलेल्या कुटुंबांना आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी 100 दिवसाचा रोजगार उपलब्ध करुन देण्याची हमी या कायदयामध्ये आहे. 2) या योजनेंतर्गत किमान 50% खर्चाची कामे ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत करणेची आहेत.उर्वरित कामे इतर शासन यंत्रणेमार्फत करणेची आहेत. 3) कामांचे अकुशल व कुशल यांचे प्रमाण पंचायत समिती स्तरावर हे 60:40 प्रमाण राखले जाईल हे पहावयाचे आहे. 4) कामाची मागणी करण्या-या कुटुंबांची नोंदणी ग्रामपंचायतीमध्ये करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर कुटुंबास रोजगारपत्रक (जॉबकार्ड) दिले जाईल कुटुंबाची नोंदणी पाच वर्षाचे कालावधीकरिता असेल. सन 2012-13 मध्ये 117262 मजूरांना जॉबकार्ड काढणेत आलेले आहे. जॉबकार्ड नूतनीकरण मोहिम जिल्हयात सुरु असून जॉबकार्ड काढणेसाठी 32000 हजार कुटुंबांचे फोटो काढून पूर्ण करणेत आले आहे. 5) अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवून सामाजिक अंकेक्षणाचे तत्व अनुसरले जाईल. सर्व माहिती कामावर, ग्रामपंचायतीमध्ये व वेबसाईटवर उपलब्ध करुन देणेची आहे. 6) योजनेंतर्गत कामासाठी वापरण्यात येणा-या प्रत्येक हजेरीपटास विशिष्ट क्रमांक असेल. 7) मग्रारोहयो कामावरील स्त्री / पुरुष मजूरांना मजूरीचा दर समान असेल सद्याच्या मजूरीचा दर रुपये 145/- प्रतिदिन आहे. कामाचे मुल्यांकनावर आधारीत मजूरी दिली जाते. 8) मजूरीचे प्रदान पोष्ट / बँक खात्यामार्फत. काम केल्यावर जास्तीत जास्त 15 दिवसात मजूरी वाटप. जिल्हयात 57293 मजूरांची खाती पोष्टात उघडलेली आहेत. तसेच 4799 मजूरांची खाती राष्ट्रीयकृत बँकत उघडणेत आलेली आहेत. 9) कामावर कंत्राटदार लावण्यास बंदी आहे. तसेच मजूरामार्फत करता येण्यासारख्या कामावर मशिनरी लावण्यास बंदी आहे. 10) तक्रार निवारणेसाठी अंबूड्समॅन ( ची नेमणूक. ( आपल्या जिल्हयात श्री. प्रशांत दत्तात्रय पटवर्धन, मु. लोटे, ता. खेड. यांची तक्रार निवारण प्राधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी नं. 9422052132) 11) गावापासून 5 किमी अंतरावर रोजगार दिल्यास 10% जास्त मजूरी, कामावर पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार, बरोबर आणलेल्या 6 वर्षाखालील लहान मुलांना सांभाळण्यासाठी सोय, तसेच दुखापत झाल्यास रुग्णास सर्व रुग्ण सेवा तसेच दैनिक मजूरीच्या 50% सानुग्रह रुग्ण भत्ता अपंगत्व व मृत्यु झाल्यास रक्कम रुपये 50,000 पर्यंत सानुग्रह अनुदान व कुटुंब नियोजनासाठी सवलती. योजनेंतर्गत कामाचे स्वरुप :- 1) जलसंधारण व जलसंवर्धन कामे मातीचे बांध, दगडी बांध, कंपार्टमेंट बांध, वनराई बंधारे, जैविक बांध, सलग समतलचर, सामूहीक शेततळे, साठवण तलाव, गाव तलाव, भूमिगत बंधारे इ. दुष्काळ प्रतिबंधक कामे वृक्षलागवड वनीकरण इ. 2) जलसिंचन कालव्याची कामे मातीचे कालवे, कालव्याचे नूतनीकरण. 3) अनुसूचित जाती / जमाती इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या जमिनीसाठी जलसिंचन निर्माण सुविधांची कामे. 4) पारंपारिक पाणीसाठयाचे नूतनीकरण करणे व तलावातील / विहीरीतील गाळ काढणे. 5) भूविकासाची कामे. 6) फळबाग लागवड 7) रोपवन संगोपन 8) खत निर्मिती (नॅडेफ खत निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, संजिविके किंवा अमृतपाण्यासाठी खड्डा/ अझोलासाठी खड्डा.) 9) मत्स्यपालन :- अ) सार्वजनिक ठिकाणी (हंगामी )मत्स्यपालन करणे. ब) समुद्र किनाऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी मासे सुकविण्याकरिता काँक्रिटचा ओटा बांधणे. 10) भाजीपाला निर्मिती. 11) जल व घन कचरा व्यवस्थापन अ) समुद्रावर भरती ओहोटीचे पाणी अडविण्यासाठी बांधावयाचे कट्टे. ब) शोष खड्डा:- सार्वजनिक व वैयक्तिक क) पुनर्भरण खड्डा :- सार्वजनिक / वैयक्तिक 12) स्वच्छता गृहे:- अ) वैयक्तिक स्वच्छता गृहे. ब) शालेय स्वच्छता गृह. क) अंगणवाडी स्वच्छता गृह. ड) सार्वजनिक स्वच्छता गृहे 13) कुक्कुट पालनासाठी शेड 14) शेळयासांठी गोठा 15) जनावरांसाठी पक्क्या बांधकामाचा गोठा / गव्हाण व मूत्र निस्सारणासाठी टँक. 16) पूरनियंत्रण व पूरसंरक्षक कामे. 17) ग्रामीण जोडरस्त्यांची कामे- गावातील अंतर्गत जोड रस्ते. 18) राज्य शासनाशी चर्चा करुन केंद्र शासनाने मान्यता दिलेली इतर कामे. 19) राजीव गांधी भवन.

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    सम्बंधित विभागाशी संपर्क साधावा