बंद

    अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत / पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा क्षेत्रविकास कार्यक्रम

    • तारीख : 14/02/2025 -

    उद्देश :- ज्या ग्रामीण भागात अल्पसंख्याकांची लोकसंख्या लक्षणीय आहे अशा ग्रामीण भागात मूलभूत / पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन या भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे अटी व शर्ती :- ज्या ग्रामपंचायतीच्या एकूण लोकसंख्येपैकी अल्पसंख्याक समूहाची ( मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, जैन व पारसी ) लोकसंख्या किमान 100 किवा जास्त असणे आवश्यक. कामाचे स्वरुप :- कब्रस्तान/स्मशान/अंत्यविधीच्या जागेसाठी संरक्षक भिंतीसह सर्व सुविधा, 2) सार्वजनिक सभागृह / शादीखाना हॉल, 3) सर्व नागरी / पायाभूत सुविधा. उदा. पिण्याच्या पाण्याची सुविधा/विद्युत पुरवठा/इदगाह/सांडपाण्याची व्यवस्था/रस्ते/पथदिवे/सार्वजनिक स्वच्छतागृहे/अंगणवाडी, बालवाडी केंद्र इ. अर्ज कोणाकडे करावा :- ग्रामसभेच्या मंजूर ठरावासह प्रस्ताव गट विकास अधिकारी यांजकडे दि. 15 जून पर्यत व दि. 15 जुलै पर्यत गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.कडे प्रस्ताव सादर करणे.

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    सम्बंधित विभागाशी संपर्क साधावा