बंद

    15 वा वित्त आयोग

    • तारीख : 14/02/2025 -

    शासन निर्णय कमाक:पंविआ-2020/प्र.क.59/वित्त-4,ग्रामविकास विभाग दि.26 जुन,2020 अन्वये पंधराव्या केंदिय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ,दि.1 एप्रिल ,2020 ते दि.31 मार्च,2025 या पाच वर्षाच्या कालावधीत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी निधी प्राप्त झालेला आहे.केद् शासनाने राज्यांसाठी निधी विवतरीत करताना सदर निधीची परिगणना सन 2011 च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या व क्षेत्रफळ या निकषांनुसार केली आहे. प्रस्तुत निधी 1) मुलभूत/बेसिक अनुदान (अनटाईड) व 2) बंधित अनुदान (टाईड) या दोन प्रकारच्या अनुदानाच्या स्वरुपात प्राप्त झालेला असून 50-50 टक्के च्या प्रमाणात विभागण्यात आले आहे.त्यानुसार 15 व्या वित्त आयोगांतर्गत वरील दोन प्रकारच्या अनुदानाच्या स्वरुपात प्राप्त झालेला निधी पंचायत राज संस्थाना वितरणाबाबत 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी तसेच केदिय पंचायत मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या राज्यातील पंचायत राज संस्थांसाठी निधी वितरीत करण्याबाबतचे निकष, ठरविवणे,वितरीत निधीतून पंचायत राज संस्थानी करावयाच्या बाबी ठरविणेत तसेच निधी खर्च करताना पंचायतराज संस्थानी पालन करावयाची मार्गदर्शक तत्वे/सुचना ठरविणेत आलेली आहेत.

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    सम्बंधित विभागाशी संपर्क साधावा